कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांचा माहिती मेळावा संपन्न

प्रतिनिधी – दि .२४/०८/२०२३ रोजी हरित क्रांती चे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांचा माहिती मेळावा मौजे- मेखळी. चोपडे वस्ती येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक मा. तालुका कृषि अधिकारी सौ सुप्रिया बांदल यांनी महाडिबिटी व गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना व फळपीक विमा योजना,प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य, pm किसान, पिक विमा व फळपीक विमा, MREGS फळबाग लागवड व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड याविषयी मार्गदर्शन केले . मा. मंडळ कृषि अधिकारी श्री. सुभाष बोराटे यांनी पि.एम. किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना इ-केवायसी व आधार सिडिंग करण्याचे आवाहन केले
त्यानंतर कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ मा.करंजे यांनी कापूस पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. करंजे सरांनी गुलाबी बोड अळी, लाल कोळी, मावा तुडतुडे या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. तसेच सदर कार्यक्रमास मा.श्री.आनंद देवकाते सरपंच ग्रामपंचायत मेखळी व मा. सरपंच श्री. रणजित देवकाते, मेखळी ग्रा.प. सदस्य एकनाथ चोपडे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संतोष चोपडे, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.भारत देवकाते व गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषि पर्यवेक्षक श्री. संतोष पिसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी बारामती कार्यालयातील कृषी सहाय्य्क श्री. प्रदिप भंडलकर, श्री.सचिन खोमणे, श्री. गणेश पोंदकुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कृषि सह्ययक श्री. सागर चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *