बारामती, दि.२४: तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, प्राचार्या डॉ. एस. व्ही. महामुनी, प्रा. एम.एस. निंबाळकर, डॉ. ए. एस. सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी मतदारांना नमुना क्र. ६, ७ आणि ८ चे फॉर्म वाटप करण्यात आले. नवीन मतदारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. मतदार सेवेसाठी असलेले https://voters.eci.gov.in/ संकेतस्थळ, व्होटर हेल्पलाईन ॲप विषयी माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed