प्रतिनिधी – राष्ट्रीय समाज पक्षाकडून गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जनस्वराज याञा घेतली जात आहे, याची सुरवात पंढरपुर मधुन विठ्ठलाचे दर्शन घेऊन करण्यात आली, बारामती लोकसभा मतदार संघात दिनांक 28 ऑगस्ट रोजी ही जनस्वराज याञा येणार आहे, या मधे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.महादेवरावजी जानकर गावो गावी जाऊन लोकांच्या भेटी गाठी घेऊन लोकांच्या अडीअडचणी जानुण घेत आहेत ,व त्या सोडविण्यासाठी संबधीत लोकांना फोन द्वारे अथवा पञाद्वारे संपर्क करीत आहे, 28 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुर तालुक्यातून सुरवात होऊन दौंड व त्या नंतर बारामती मधे ही याञा येऊन बारामती मधील काही गावा मधे जानकर हे लोकांच्या गाठी भेटी घेणार आहेत, बारामती मधे या याञेचे जंगी स्वागत होणार आहे. त्या नंतर ही याञा पुरंदर च्या दिशेने रवाना होणार आहे,व दिनांक 29 ऑगस्ट रोजी पक्षाचा वर्धापनदिन आहे पुणे या ठिकाणी लाखोंच्या जनसमुदाय गोळा होणार आसुन या जनस्वराज याञेचा शेवट होणार असुन आगामी काळातील राजकीय परिस्थितीवर जानकर आपल्या पक्षाची भुमीका स्पष्ट करणार आहेत, अशी माहीती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी दिली.