बारामती, दि. २२: तहसीलदार गणेश शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ६६ आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ३८ असे एकूण १०४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
या बैठकीत तालुक्यातील नागरिकांनाकडून आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत एकूण ६९ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ६६ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत एकूण ४९ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३८ अर्ज मंजूर करण्यात आले. दोन्ही योजनेसाठी एकूण ११८ प्राप्त अर्जापैकी १०४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
यावेळी संजय गांधी योजनेच्या नायब तहसिलदार सुवर्णा ढवळे, अव्वल कारकून व महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत प्रत्येकी १ हजार ५०० रुपये लाभ देण्यात येतो. सध्या बारामती तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ६ हजार २३० तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ४ हजार ५२८ लाभार्थी आहेत.