पुणे, दि. २२ : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराअंतर्गत २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीतील जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी समाजसेविका व संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविका व संस्थांनी ८ ऑगस्ट २०१३ रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना, अटी व शर्तीनुसार ७ दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या गुलमर्ग पार्क, को-ऑप. हौ. सोसायटी, जाधव बेकरी जवळ, २९/२, सोमवार पेठ, पुणे येथील कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावेत, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed