प्रतिनिधी – हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त कृषी योजनांचा माहिती मेळावा दिंनाक 22 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, मोरगाव येथे कृषी विभागा मार्फत आयोजित केला होता. कार्यक्रमास संजय काचोळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे रश्मी जोशी, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती चंद्रकांत मासाळ, मंडळ कृषी अधिकारी, सुपे यांनी मार्गदर्शन केले. पाण्याची टंचाई असल्याने ठिबक सिंचन चा वापर करावा. पी.एम.किसान सन्मान निधी योजना मधील के. वाय. सी. व आधार सेडींग प्रलंबीत लाभार्थ्यांनी त्वरित के. वाय. सी. व आधार सेडींग करून घेण्याचे आव्हान त्यांनी केले. उपस्थित शेतकरी विजय ढोले, अंदोबा नेवसे, सुनील नेवसे, सुशील तावरे यांनी मांडलेल्या प्रश्नांचे निरासन त्यांनी केले. सुप्रिया बांदल यांनी महा डी. बी. टी. मार्फत कृषी विभागच्या योजनांची माहिती दिली व जास्तीत जास्त अर्ज महा डी. बी. टी. पोर्टल वर नोंदनिण्यास सांगितले. अन्न प्रक्रिया योजनेतून दुग्ध प्रक्रिया उद्योग, पेठे बनवणे व इतर उद्योगाची माहिती दिली. वैयक्तिक शेततळे योजनेतून शेततळे चा लाभ घेण्याचे आव्हान त्यांनी केले. रश्मी जोशी यांनी बदलत्या हवामान पासून पिकचे संरक्षण म्हणून शेतकरी बांधवांनी पीक विमा योजना मध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बबन तावरे यांनी मोरगाव परिसरातील शेत परस्थिती व पावसा अभावामुळे कमी पेरणी व जळून चाललेली पिकांची परस्थिती मुळे पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा असे सांगितले. व्यासपिठावर अक्षय तावरे, गणेश तावरे, सदस्य, ग्रामपंचायत मोरगाव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव लोणकर व आभार प्रदर्शन प्रसाद तावरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed