क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव
बारामती : विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करावे तसेच ते अमलात देखील आणावे. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा करा, तेच प्रयत्न तुम्हाला यशाच्या शिखरावर बसवतील, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या वतीने विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर क्रिएटिव्ह चे संस्थापक बाळासाहेब घाडगे , शेषराव काळे यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक भोईटे व प्रा. बानगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिद्धी वजरींकर या विद्यार्थिनीने 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 710 गुण मिळवून राज्यात मुलींमध्ये प्रथम तसेच भारतामध्ये 44 वा क्रमांक पटकावून क्रिएटिव्ह अकॅडमीच्या यशामध्ये मानाचा तुरा खोवला. त्यामुळे तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला .तसेच सिद्धी पवार ,आदित्य राऊत, श्रेया वरणे ,सई चव्हाण, पुष्कर टकले ,अनिरुद्ध गायकवाड, प्रेमराज जाधव, अनुज चव्हाण, श्रद्धा शितोळे ,तृप्ती येवले, स्नेहल जाधव, रवीना कुमावत, प्रतीक खोमणे, निकिता जायभाय, गीता बेलदार, गायत्री कट्टे , सुहानी नाळे या गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. क्रिएटिव्ह अकॅडमीचे संस्थापक घाडगे यांनी भविष्यात क्रिएटिव्हची विद्यार्थ्यांच्या जडणघडणी विषयाची धोरणे स्पष्ट केली. सल्लागार अक्षयकुमार राऊत ,कालिदास मोटे , मुख्याध्यापक रामचंद्र साळुंखे यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.