निमगाव केतकी सबस्टेशन ओव्हरलोड मुळे शेतकरी त्रस्त, युवासेनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा…

प्रतिनिधी – इंदापूर उपविभागातील निमगाव केतकी हे सबस्टेशन ओव्हरलोड असल्याकारणाने सदरील सबस्टेशन मधून ज्या शेतीपंप गावांना वीज विद्युत पुरवठा केला जातो, तो अतिशय कमी दाबाने केला जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत शेतीपंप जळत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.निमगाव सब स्टेशन मधील कर्मचारी अधिकाऱ्यांना सदरील विषयासंदर्भात जाब विचारला असता,त्यांच्याकडून सबस्टेशन ओव्हरलोड असल्याचे तोंडी सांगितले जात आहे. सदर बाब त्रस्त शेतकऱ्यांनी युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस सुरज सानप व निमगाव निमसाखर गटाचे युवासेना उपतालुका प्रमुख योगेश हरिहर यांच्या निदर्शनास आणून दिली.
युवासेनेच्या वतीने सदर विषयाची तात्काळ दखल घेऊन बारामती उपविभागाचे कार्यकारी अभियंता व इंदापूरचे उप कार्यकारी अभियंता यांना इंदापूरच्या सहाय्यक अभियंता सविता मोटे मॅडम व प्रमोद जाधव साहेब यांच्या हस्ते सदर बाबत आपल्या स्तरावरुन दोन दिवसात योग्य कार्यवाही करुन आवश्यकतेनुसार विद्युत पुरावा करणेबाबत निवेदन देऊन तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप, युवासेना उपतालुका प्रमुख योगेश हरिहर,युवासैनिक दादा बरळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *