बारामती दि. 18 ड्रीम इव्हेंट डिझायनर यांच्या वतीने दिनांक 28 ,29, आणि 30 जुलै 2023 रोजी मान्सून फॅमिली शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते

या एक्जीबिशनला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या नावाची नोंदणी करून लकी ड्रॉ काढण्यात आला.
या लकी ड्रॉ विजेत्यांना चंदुकाका सराफ आणि योगसिद्धीज टेक्स्टाईल यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली .

यामध्ये चंदूकाका सराफ या सुवर्णपेढीच्या वतीने अनुक्रमे राणी गुळूमकर, शुभांगी कदम, आणि शर्मिला भोकरे यां भाग्यवान ग्राहकांना बक्षीस प्रदान करण्यात आले तर योगसिद्धीज टेक्स्टाईलच्या वतीने अनुक्रमे शुभांगी कुंभारकर, किरण शिपटे आणि गोकुळ कोळपे या भाग्यवान ग्राहकांना बक्षीस देण्यात आले.

यावेळी संतोष मुळे, रोहित अवधे, नवनाथ गिरे , चरणसिंह बडगुजर , रोहित शबनवर ,सोनाली जगताप, अश्विनी सावंत उपस्थित होते. दर्शना जैन, गीता पोटे, अस्मिता फाळके आणि दिपाली सावंत यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

या तीन दिवशी कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून योद्धा प्रोडक्शन व डिझाईन वर्ल्ड यांनी जबाबदारी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed