अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणात भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन समारंभ दि. १५ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ.हर्षवर्धन व्होरा यांच्या शुभहस्ते व संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत म्हणण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले व त्यांना शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी समीक्षा क्रममध्ये संचलन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ या उपक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे उदघाटन झाले असे जाहीर केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त चंद्रगुप्त शाह वाघोलीकर तसेच संस्थेचे अन्य विश्वस्त, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज चे संचालक डॉ.एम.ए.लाहोरी, अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्या डॉ.ऋचा तिवारी, महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.विवेक बळे, जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ.गौतम जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, रजिस्ट्रार व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख व सेवक देखील उपस्थित होते.
Post Views: 222