सहेली फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पोर्ट्स ड्रेस व शूज वाटप…

प्रतिनिधी – जि.प.प्राथ.शाळा घोडेवस्ती केंद्र डोरलेवाडी येथील सर्व मुलांना श्रीमती रोहिणी खरसे आटोळे अध्यक्षा सहेली फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पोर्ट्स ड्रेस व शूज देण्यात आले. शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस व शूज दिल्याबद्दल परिसरातील सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणप्रेमी श्री काशिनाथ घोरपडे व सदस्य श्री दिपक घोडे, श्री सोमनाथ लांडगे, श्री रुपेश घोडे, श्री सोमनाथ यादव, श्री प्रताप घोरपडे, श्री रमेश खोत, श्री गणेश वाईकर, श्री आकाश जोशी, श्री दिनेश वाईकर, श्री सुरेश बिरदवडे, अजित बिरदवडे, श्री नितीन घोडे, श्री किशोर घोडे, श्री अक्षय खुडे,श्री कुलदीप घोडे,श्री श्याम घोडे, श्री औधुत घोडे,श्री सूरज कोकरे, श्री आगतराव जगदाळे, श्री संदीप जगदाळे,सौ विद्या जगदाळे, सौ अर्चना कारंडे, शिक्षणप्रेमी श्री काशिनाथ घोरपडे, शाळेला मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते श्री हरिभाऊ आटोळे, अंगणवाडी सेविका सौ सोनाली घोडे सर्व सदस्य पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीम रोहिणीताई खरसे आटोळे यांचे शाळेला नेहमीच सहकार्य लाभते त्यांच्या सहकार्याबद्दलची महिती शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल निकम यांनी सर्व पालकांना दिली. कार्यक्रमाचा समारोप करताना श्री नरुटे अंबादास यांनी पालकांनीही शाळेस असेच नेहमी सहकार्य करावे असे सांगून सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *