प्रतिनिधी-: बारामती शहरातील यादगार सिटी येथे मुस्लिम समाजातील मुला मुलींना मराठी व इंग्लिश मेडियम शिक्षणाबरोबरच उर्दु/अरबी भाषेचे शिक्षण मिळावे याहेतुने अंजुमन तालिमुल कुरान यासंस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी मकतब चालविले जाते. याच ठिकाणी राष्ट्रीय सण साजरे करून भारताच्या विविधतेचे दर्शन व माहिती देण्याचे उपक्रम नेहमीच राबविण्यात येतात त्याचाचा एक भाग म्हणून भारताचा स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट निमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची माहिती व देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन व माहिती देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अब्दुल रहमान बाबूलाल इनामदार यांनी स्वतंत्र वीरांनी आपल्या भारत देशासाठी केलेल्या बलिदानाचे किस्से सांगितले. आपण चांगले नागरिक होऊन आपल्या देशाची कशी सेवा, प्रगती करता येईल यावर मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी हाफिज इमरान ताजुद्दीन, हाफिज नईम , मौलाना अब्दुल करीम सफीउल्लाह , हाफिज आसिम नईम शेख, हाफिज सोहेल भाई बागवान, जावेद भाई पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी करण्यासाठी यादगार सोशल फाउंडेशनचे सर्वसदस्यानी परिश्रम घेतले, संस्थापक अध्यक्ष फिरोज अजीजभाई बागवान यांनी सर्वांचे आभार मानले .