प्रतिनिधी – बारामती तांदुळवाडी रोड येथील इन्फेन्सी किड्स प्ले स्कूलमध्ये स्वतंत्र दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी 7.30 वाजता श्री किरण पवार डायरेक्टर ऑफ फ्युजन ग्रुप यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व झेंडावंदन गीत झाल्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती रुपाली खारतोडे यांनी श्रीफळ व पुष्प देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी सतीश साबळे डायरेक्टर ऑफ इन्फेन्सी किड्स प्ले स्कूल तसेच गौरव साबळे डायरेक्टर ऑफ इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल व सौरव साबळे ट्रेसरर ऑफ इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल व इतर मान्यवर उपस्थित होते.

  या कार्यक्रमासाठी शाळेची इमारत सुंदर प्रकारे सजविण्यात आली होती, त्यामुळे वातावरण प्रसन्न व शांत होते. शिक्षकांनी सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली. काही विद्यार्थ्यांनी या दिनाचे औचित्य साधत भाषणे सादर केली. प्रमुख वक्त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले  व सर्वांचे कौतुक केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती रुपनवर, प्रास्ताविक सौ कविता डोईफोडे यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा म्हणून सौ अर्चना चांदगुडे व सौ भारती पठाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *