बारामती : देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.. बारामती तालुक्यातील झारगडवाडी चे युवा सरपंच अजित दिलीप बोरकर यांनी ७६ व्या स्वातंत्र्य दिना दिवशी ग्रामपंचायत समोर स्वतः तिरंगा ध्वज न फडकवता देश सेवा केलेल्या वीर पत्नी आणि माजी सैनिकांना ध्वजारोहण करण्याचा मान देऊन सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे यामुळे या सरपंचाचे सर्वत्र कौतुक होत आहे.. यावेळी सरपंच यांनी आलेल्या माजी सैनिक रहीम सय्यद, विलास घनवट, अशोक शेडगे, शंकर करे, आणि वीर पत्नी सुनंदा नाळे यांना ग्रामपंचायतच्या वतीने शाल श्रीपळ देऊन त्यांचा सत्कार देखील केला..
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, सरपंच अजित बोरकर, उपसरपंच सोनाली करे, माजी सरपंच वैशाली मासाळ, माजी सरपंच नितीन शेडगे, माजी उपसरपंच वैष्णव बळी, ग्रामपंचायत सदस्या कल्पना झारगड, मालन टिंगरे, पूनम आवटे, सोनाली चव्हाण, पोलीस पाटील शोभा बोरकर, ग्रामस्थ शिवाजी बोरकर, प्रवीण बोरकर, संतोष मासाळ, अविनाश जाधव, रामभाऊ करे, हनुमंत झारगड, राहूल बिचकूले, गणेश बोरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कमी कालावधी मिळालेल्या सरपंचांना गावात कामे करून आपला ठसा उमटवायचा असतो यामुळे पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याकडून मान पानाची आलेली कुठलीच संधी डावलली जात नाही, मात्र युवा सरपंच अजित बोरकर याला अपवाद आहेत त्यांनी त्यांच्या काळात १५ ऑगस्ट या ७६ व्या स्वतंत्रदिना दिवशी स्वतः ध्वज न फडकवता देश सेवा केलेल्या माजी सैनिक आणि वीर पत्नी यांना ध्वजारोहण करण्याची संधी देत त्यांना मान दिला आहे आणि त्यांचा सन्मान देखील केला आहे यामुळे या झारगडवाडी युवा सरपंचाचे सर्वत्र तोंड भरून कौतुक होत आहे..