प्रतिनिधी – युवासेना बारामती विधानसभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या सूचनेनुसार शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली युवासेना विभागीय सचिव अविनाशभाऊ बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना जिल्हाप्रमुख अँड राहुल शिंदे युवासेना उपजिल्हाप्रमुख अँड.अनिल शेडगे यांच्या प्रयत्नाने रविवार दि 13/08/23 रोजी हॉटेल कृष्णसागर बारामती येथे युवासेनाची आढावा बैठक पार पडली. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघात नवीन युवासैनिकांनीं यापुढे सक्रिय काम करण्यासाठी युवासेनेमध्ये प्रवेश केला, यावेळी बोलताना अविनाशभाऊ बलकवडे यांनी यापुढे सतत संघर्षाची भूमिका घेत सक्रियपणे सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणाऱ्या युवसैनिकांनी शिवसेना संघटने मध्ये योग्य जबाबदारी देणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी युवासेना शहर प्रमुख गणेश करंजे, शिवसेना आरोग्य सेना जिल्हा सचिव दिलीप नाळे, युवासेना तालुका प्रसिद्धीप्रमुख अक्षय बाफना, बारामती तालुका संघटक निलेश महाडिक, उपतालुकप्रमुख सागर तावरे, शुभम निकम, अनिकेत साळुंखे, ऋषिकेश शेडगे, किरण साळुंखे, निशांत शेडगे, रामभाऊ करे, आबा गव्हाळे, गजानन जगताप, राहुल चव्हाण व इतर मोठ्या प्रमाणावर युवासैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed