प्रतिनिधी – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामधील मिडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज् विभागाच्या वतीने दरवर्षी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त १९ ऑगस्ट रोजी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले जाते. वेगवेगळ्या विषयांवर आधारित भारतभरातून फोटोग्राफर या स्पर्धेला फोटो पाठवतात, त्या सर्व फोटोंचे प्रदर्शन महाविद्यालयामध्ये भरवले जाते. ते सर्वांसाठी खुले असते. यावर्षीदेखील या दिवसाचे औचित्त साधून टी. सी.कॉलेज, बारामती आणि बारामती नगर परिषद, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ आणि २१ ऑगस्ट २०२३ रोजी “थ्रू द लेन्स” या नावाने फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी पीपल्स, प्लेस, नेचर आणि स्वच्छ, सुंदर बारामती हे विषय देण्यात आले आहेत. विद्यार्थी, हौशी फोटोग्राफर आणि व्यावसायिक फोटोग्राफर्स दिलेल्या विषयांच्या अंतर्गत फोटो पाठवून सहभागी होऊ शकतात, स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही, तसेच वयोमर्यादेची अट नाही. स्पर्धेकरिता दिलेल्या प्रत्येक विषयासाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांक काढण्यात येणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धकांस पारितोषिक दिले जाणार आहेत. आणि अन्य सहभागींना ई – सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्वतः काढलेला आठ बाय बारा साईजचा फोटो महाविद्यालयातील मिडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज् विभागामध्ये जमा करावा. फोटो प्रिंट करून जमा करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत राहील. फोटोग्राफर्सनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.अविनाश जगताप केले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9881361758 आणि 8862074170 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed