बारामती – येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.श्रीकृष्ण साळुंके यांना मुंबई विद्यापीठ, मुंबई यांनी नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. ‘Synthesis and Characterization of BODIPY-Based Near IR Molecular Probes ’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. मुंबई विद्यापीठातील डॉ.सुदेश मांजरे यांनी त्यांना शोधनिर्देशक म्हणून मार्गदर्शन केले. डॉ. श्रीकृष्ण साळुंके तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात गेल्या २९ वर्षांपासून अध्यापन करीत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध परिषदांमध्ये सहभागी होवून संशोधन प्रबंध सादर केलेले आहेत.
डॉ.श्रीकृष्ण साळुंके यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, विभागप्रमुख, उपप्राचार्य, प्राध्यापक-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *