बारामती:- नुकताच झालेल्या सिद्दीविनायक विकास प्रतिष्ठान क्षत्रिय नगर, टकार कॉलनी बारामती येथे प्रतिष्ठानच्या 25 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत तीन दिवस सांस्कृतिक, कीर्तन, भारुड, महाप्रसाद, महाआरती, डान्सस्पर्धा,भव्य मिरवणूक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, ओंकार जाधव, संतोष जाधव, गणेश गायकवाड, सयाजी गायकवाड, सुभाष जाधव(सरपंच) महेश गायकवाड, बाळासाहेब जाधव(महाराज), मिलिंद गायकवाड सह अनेक जणांना पुरस्कार देण्यात आला. सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिल गायकवाड(मा. उपनगराध्यक्ष)व पदाधिकारी सदस्य, समाज बांधव, क्षत्रिय तरुण मंडळ, महिला भगिनी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शरयू फाउंडेशन च्या सौ शर्मिलावहिनी पवार, मा. जेष्ठ नगरसेवक सुभाष अप्पा ढोले, ऍड काटे यांच्या सह अनेक मान्यवऱ्याच्या उपस्थितीत सत्कार सोहळा कार्यक्रम कार्यक्रम पार पडला. सत्कार मूर्तीचा सौ.शर्मिला वहिनी पवार यांनी सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे बाळासाहेब(अनिल) गायकवाड, शेखर गायकवाड, संजय गायकवाड,गणेश गायकवाड, संजय जाधव,संजय गायकवाड,राजेंद्र निगडे, लक्ष्मण जाधव,सतिष गायकवाड,सुनील जाधव, मिलिंद गायकवाड व क्षत्रिय तरुण मंडळाचे अध्यक्ष लखन(वस्ताद)गायकवाड, संदीप दिनकर जाधव व पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन महेंद्र सर गायकवाड यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed