संभाजी भिडे याच्या वक्त्याव्याचे निषेधार्थ निषेध सभा व मोर्चाचे आयोजन…

बारामती:- संभाजी भिडे मूळ नाव (मनोहर कुलकर्णी) यांच्या विदर्भ दौऱ्यामध्ये अमरावती येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत वाईट शब्दात वादग्रस्त वक्त्याव्य केले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, व महात्मा जोतिबा फुले यांच्या बद्दल समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा म्हणून विधान केले असून त्यांची तांबोडतोब चौकशी करून अटक करावी. याच्या विरोधात देश द्रोहाचा कुणाला दाखल करून तातडीने अटक करावी असे निवेदन देण्यात आले. बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती. याच्या वतीने निषेध सभा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निषेध सभा व निषेध मोर्चास काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी बिग्रेड , बौध्द युवक संघटना , आर पी आय (ए – गट) , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती , बारामती तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , श्री.संत सावतामाळी संघ बारामती तालुका, सावता परिषद बारामती , मानव अधिकार संघटना , मराठा सेवा संघ , आणि आदरणीय श्री.सुरेश खोपडे माजी निवृत्त आयपीएस अधिकारी यांनी एकमतांने यावेळी उपस्थित राहून पाठिंबा दिला व निषेध नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *