प्रतिनिधी – मौजे मेडद ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 414/2 ही जागा म्हाडा प्राधीकरण, पुणे यांच्या नावावर होती त्यानंतर सदर जागा सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व जिल्हाधीकारी मुद्रांक पुणे ग्रामीण यांच्या कडे कायदेशीर नोंदणी शुल्क भरून मानीव खरेदी खताने जवळपास 206 व्यक्तींनी खरेदीखत करून विकत घेतलीं आहे. उपोषण कर्ते यांच्या नावावर म्हाडा प्राधीकरणाने सदर जागेची ताबा पावती नकाशासह सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्क्यानीशी दिली आहे. सदर जागा अजुनही कब्जे वहिवाटीत आहे. अजुन आम्ही कुणालाही खरेदीखत करून अगर कायदेशीर विक्री करून ताबा दिला नाही. किंवा म्हाडा प्राधिकरणाने सुध्दा आमच्या कडून खरेदीखत पलटवून जागेचा ताबा कायदेशीर मार्गाने परत घेतला नाही. त्यामुळे सदर जागेची मालकी व ताबा पुर्णपणे आमच्या हक्कात आहे.
सदर जागेविषयी प्रकरण मा.जिल्हा सत्र न्यायालय, बारामती दावा क्र. 434/2021 व मा. उच्च न्यायालय, मुंबई दावा क्र. 3035/2022 येथे न्याय प्रविष्ट आहे. तसेच त्यावर सुनावणीच्या तारखा चालू आहेत. मग सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असताना प्लॉट धारक मा. न्यायालयात न्याय मागायला गेले असताना आमच्या माहिती प्रमाणे म्हाडा प्राधिकरण व मा. प्रांताधिकारी बारामती, मा. तहसिलदार बारामती, मा. गांव कामगार तलाठी मौजे मेडद तसेच मंडल अधिकारी मौजे उंडवडी यांनी परस्पर कायदेशीर जागेचा ताबा असलेल्या जमीन मालकांना कुठलीही अधिकृत कल्पना, हरकती नोटीस न देता व सदर जागेचे प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना जमीन मालकांना अंधारात ठेऊन परस्पर जागेच्या दस्तावेज 7/12 यावर बेकायदेशीरपणे राजकिय हस्तक्षेपाने व शासकिय अधिकार्यांनी पदाचा गैरवापर करून म्हाडा प्राधिकरणचे नांव रद्द करून शासकिय आयुर्वेदिक कॉलेज यांचे नावाची नोंद केल्याचे दि. 5 जुलै 2022 रोजी मा. तलाठी मौजे मेडद ता. बारामती यांच्याकडून मिळालेल्या अधिकृत 7/12 वर झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. जरी म्हाडा प्राधिकरण यांचे नांव यासंदर्भातील जुना व नवा 7/12 आपणांस माहितीसाठी सोबत जोडत आहे. सदर कृत्य हे परस्पर संगनमताने, बेकायदेशीरपणे व शासकिय अधिकारांचा गैरवापर करून मुळ जमीन मालकांना जागेतुन हटवण्यासाठीच्या हेतुने व अन्यायकारक पध्दतीने अंधारात ठेऊन मा. न्यालयात सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना मा. न्यायालयाच्या अवमान केल्याचे दिसुन येत आहे. सदर प्रकरणा विषयी आम्ही दि. 6 जुलै 2022 रोजी मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता व मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे दि. 28 मार्च 2023 रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन व उपोषण सुध्दा केले आहे. परंतू आज तागायत कुठलाही ठोस न्याय मिळाला नाही. त्यामुळे आम्ही सर्व प्लॉट धारक गुरूवार दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वां. मा. प्रांताधिकारी व मा. तहसिलदार, बारामती कार्यालय, मध्यवर्ती शासकिय इमारत, इंदापूर रोड, बारामती येथे सर्व प्लॉट धारक लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत. उपोषण कर्ते आनंद धोंगडे व सहकारी यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.