प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस व मीडिया प्रेस यांच्या वतीने साथी अभियानांतर्गत बालकांच्या समुपदेशन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधींसंघर्ष बालकांचे समुपदेशन करण्यात आले .या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून बारामती ग्रामीण चे पोलीस उपनिरीक्षक श्री गीते उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सध्या अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मोबाईल चा वापर करत आहेत व त्या अनुषंगाने त्यांच्याकडून अनेक वादग्रस्त फोटो किंवा मजकूर प्रसारित होत असतात व त्यातून अनेक गुन्हे घडतात. यासंबंधी गीते साहेबांनी यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या निर्भया पथकाची माहिती त्यांनी दिली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे पी.पी.उपमुख्याध्यापक श्री देवडे के.डी. पर्यवेक्षक श्री निवास सणस,सर्व शिक्षक बंधू-भगिनी ,व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी इंडिया न्युज चे श्री उपचंद शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तर कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक श्री निवास सणस यांनी मांडले. सूत्रसंचालन श्री सुदाम गायकवाड यांनी केले.