सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला तब्बल दहा पुरस्कार

टी. सी. च्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा विद्यापीठाकडून पारितोषिक देऊन सन्मान

बारामती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, उत्कृष्ट संघनायक , उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट शिबीर सहभाग असे एकूण १० पुरस्कार देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्या मा. सौ.बागेश्री मंथाळकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, श्री. शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. वायदंडे, श्री प्रसन्नजीत फडणवीस, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी, रा.से.यो. चे माजी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजनेमधील उत्कृष्ट कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यापीठ व जिल्हा स्तरावर पुरस्कार प्रदान केले जातात.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. अविनाश जगताप यांना उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. विलास कर्डिले यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी विद्यापीठस्तरीय वर्ष २०१८-१९ आणि उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राज्यस्तरीय वर्ष २०२०-२१ असे दोन पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हा समन्वयक वर्ष २०१९-२०,  तसेच उत्कृष्ट संघनायक, राज्यस्तरीय सहासी क्रिडा शिबीर चिखलदरा, पुणे ते पंढरपूर राज्यस्तरीय पायी वारी असे दोन पुरस्कार अश्या एकूण पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. डॉ. भगवान माळी यांना कोल्हापूर पुर आपत्ती निवारण शिबिरामध्ये वर्ष २०१९ मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयातील कु.गणेश दडस उत्कृष्ट स्वयंसेवक आणि कु.गंधाली भट उत्कर्ष शिबीर सहभाग या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. जवाहर शाह वाघोलीकर आणि सचिव मिलिंद शाह वाघोलीकर संस्थेचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आणि प्राध्यापक यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे विशेष अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *