प्रतिनिधी – इंदापुर पोलीस स्टेशन, बावडा पोलीस दुरक्षेत्र, निमगाव केतका, सरडेवाडी या परीसरात शेतक-यांचे शेळया, बोकड चोराचे वाढते प्रमाणाचे अनुषांगाने इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी बावडा पोलीस दुरक्षेत्र तपास पथकातील सपोनि नागनाथ पाटील, सहा. फौजदार शिंदे, पो.ना. गायकवाड, पो.अं विनोद लोखंडे, पो अं आरीफ सय्यद, विक्रम जमादार यांना बोलावुन चोरीचे गून्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्याने सपोनि नागनाथ पाटील व बावडा तपास पथकाने प्राप्त माहीतीच्या आधारे १. मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे २ पॉयझन उर्फ प्रथमेश धर भोसले दान्ही रा रेडा ता इंदापुर जि पुणे ३. निलेश बाबासाहेब सरवदे रा काटी ता उदयपुर जि पुणे व दोन विधीसंघर्ष बालक यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यानी १० ठिकाणी चोरीकेल्याचे कबुल केले. त्यांचेकडुन इंदापुर पोलीस स्टेशनचे १७ गुन्हे उघड करून चोरीमधील ५३५००/- चा रोख रक्कम मुददेमाल जप्त केला आहे. सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण श्री अंकीत गोयल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोइटे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा पोलीस उपनिरीक्षक के. बी शिंदे, पो हवा जाधव, पो. ना कदम, पोना कळसाईत, पो ना गायकवाड, पो. ना हेगडे, पो अंमलदार अकबर शेख, विक्रम जमादार, गणेश डेरे, विनोंद लोखंडे, नंदु जाधव व आरीफ सय्यद यांनी केली