प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांचा रासेयो सन्मान पुरस्कार सोहळा 04 ऑगस्ट 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहत संपन्न झाला .यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय सुपेच्या माध्यमातून 2018-19 व 2019-20 या कालावधीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट स्वयंसेवक प्रशंसा पुरस्कार देऊन वैभव भापकर यांना सदर पुरस्कार व गौरव प्रमाणपत्र प्रदान देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर नांदगुडे यांनाही उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिंगनापुरकर, भाग्यश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, डॉ.संदीप पालवे, वित्त व लेखाधिकारी सुचेता गायके प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे विध्यार्थी विकास मंडळ संचालक अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.सदानंद भोसले इ. मान्यवर व पुरस्कार्थी प्राध्यापक विध्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संस्थेच्या वतीने आणि सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.