प्रतिनिधी- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महसूल सप्ताहानिमित्त युवा संवाद व विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल शाखा बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणा-या उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखल इ. कागदपत्रांची माहिती, शिष्यवृत्तीची माहिती देण्यात आली. बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी युवकांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी डॉ.अविनाश जगताप होते. विद्यार्थ्यांशी बोलताना गणेश शिंदे यांनी सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. चांगल्या मित्रांची संगत ठेवावी. अधिकाधिक शिक्षणाचे ध्येय बाळगावे. आई वडील व शिक्षकांप्रती आदर बाळगावा- मूल्याधिष्ठित शिक्षण घ्यावे व स्पर्धेला सामोरे जावे. तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी अवगत करून स्वतःला अद्ययावत ठेवावे असे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले. बारामतीचे गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांनी विविध शिष्यवृत्ती व व दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना इ. बाबत मार्गदर्शन केले. श्री.त्रिंबक ताम्हाणे यांनीही विविध योजनांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
पंचायत समिती, बारामती विस्तारअधिकारी श्री.नवनाथ कुचेकर, श्री.सागर गायकवाड, शालेय पोषण आहार योजना, अधिक्षक श्री.अतुल मोरे हे मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या कला शाखा अधिष्ठाता डॉ.सीमा नाईक गोसावी यांनी केले तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.वैशाली माळी यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ.विलास कर्डीले यांनी विशेष परिश्रम घेतले. ५०० विद्यार्थ्यांनी कार्य्रक्रमात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed