प्रतिनिधी – बारामती शहराचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना निवेदन देऊन मनोहर भिडे याना अटक करावी अशी मागणी बारामती काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. भिडे याने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी अपशब्द वापरून समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेली आहेत. भिडेने वेळोवेळी महापुरुषांचा अपमान केलेला आहे. तरी त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करावे असे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी रोहित बनकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी बिलाल बागवान, सुरज येवले शहर अध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग, सुरज भोसले पुणे जिल्हा vjnt उपाध्यक्ष काँग्रेस हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed