अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायक: -बिरजू मांढरे

बारामती: २१ व्या शतकाकडे जात असताना सुद्धा श्रमिक व शोषित यांच्या साठी लेखणीतून, पोवाड्यातून विविध माध्यमातून लढा उभा करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे मत मा उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी व्यक्त केले

डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मा. उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, राजेंद्र बनकर, भारत अहिवळे, मा.नगरसेवक किरण गुजर अतुल बालगुडे,सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण ,कुंदन लालबिगे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर,शहर अध्यक्ष जय पाटील ,युवक अध्यक्ष अविनाश बांदल, महिला अध्यक्ष अनिता गायकवाड, मार्केट कमिटी सदस्य शुभम ठोंबरे व मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष राजू मांढरे, धनंजय तेलंगे, किशोर मसाळ व सर्व पत्रकार, इतर मान्यवर उपस्तीत होते.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार बालवयात, तरुण पिढीमध्ये सर्वत्र पोहोचावे आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकांनी काम करावे या उद्देशाने दरवर्षी डॉ आंबेडकर वसाहत येथे विध्यार्थी दत्तक योजना, व्यसन मुक्ती, गुणवंत विद्यार्थी ,स्पर्धा परीक्षा मधील यशस्वी विद्यार्थी व विविध क्षेत्रातील यशस्वी समाज बांधव यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो व त्यांना शाबासकी देण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांच्या विचार मंचावर केला जात असल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले.

दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, लोकनाट्य, पोवाडे, प्रवास वर्णन , लावण्या, गाणी दिली आणि त्या माध्यमातून समाज जागृती केली खऱ्या अर्थाने त्यांचे कार्य श्रमिक आणि शोषित यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले. सामाजिक उपक्रमातून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते हे कौतुकास्पद असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले. तरुणाचे संघटन सामाजिक क्षेत्रासाठी वापरले जात असल्याने सदर उपक्रम आदर्शवत असल्याचे मा नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.
एस आर पी एफ मध्ये निवड झालेले गणेश अवघडे, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झालेले वरून खंडाळे, मिस्टर यूनीव्हीवर्सल बॉडी बिल्डर हर्षद खंडाळे व दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षा मधील यशस्वी विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळे आभार सुनील शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *