माळेगाव ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) पाहुणेवाडी गावचे ग्रामसेवक श्री कांतीलाल काळाणे त्यांचा काल निरोप सभारंभ संपन्न झाला. गेली नऊ वर्षे गावासाठी अहोराञ काम करणारे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व, 18 वर्ष देशसेवा करुन पुन्हा प्रशासकीय सेवेत दाखल होऊन पुन्हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरी सेवा काय असते त्याचे जिवंत ऊदाहरण म्हणजे काळाणे भाऊसाहेब आहेत असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. पाहुणेवाडीच भाग्य आहे की 2012 साली हा माणुस पाहूणेवाडी गावामध्ये सेवेत आले आणि गावाचा कायापालट झाला. अशा या देशसेवकाला गावाच्या वतीने पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पाहुणेवाडी ग्रामपंचायतचे मा.सरपंच भगवानराव तावरे, ॲड. विजय तावरे, पाहुणेवाडी वि.का.सो.मा.चेअरमन जयराम तावरे, पाहुणेवाडी ग्रामपंचायतचे मा.सरपंच शशिकांत (पिनु पाटील ) तावरे, विद्यमान चेअरमन रणजित तावरे, बारामती दुध संघाचे मा.चेअरमन सतिश तावरे, दत्ताञय खुडे, आनंता तावरे, दत्ताञय जाधव, राजेंद्र ताकवले, गणेश तावरे, रणजित रा.तावरे, समिर खुडे, महेश खुडे, यांनी ग्रामसेवक यांना रोप व श्रीफल शाल देऊन सत्कार करण्यात आला. व हा कार्यक्रम संपन्न झाला