प्रतिनिधी – बारामती मध्ये ड्रीम्स इव्हेंट डिझायनर यांच्यावतीने मान्सून फॅमिली शॉपिंग अँड फूड फेस्टिवल चे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम राजमाता जिजाऊ भवन भिगवण रोड येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते काल संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला.

बारामती आणि परिसरातील व्यावसायिक महिलांसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते, यामध्ये हजारो रुपयांची उलाढाल होऊन महिलांनी बनवलेल्या, सजवलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम या शॉपिंग उत्सव मधून होताना दिसत आहे.  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या वस्तू इथे विक्रीस उपलब्ध असतात त्यामुळे बारामतीकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमासाठी चंदुकाका सराफ, योगसिद्धी टेक्स्टाईल मार्केट, किक ev इलेक्ट्रिक बाइक यांनी प्रायोजकत्व दिले असून कार्यक्रमाचे आयोजन सौ अस्मिता फाळके, सौ दर्शना जैन, सौ गीता पोटे यांनी केले आहे. या प्रदर्शनात भेट देणाऱ्या प्रत्येकास गिफ्ट, डिस्काउंट कुपन, लकी ड्रॉ चा फायदा होणार आहे.  हे प्रदर्शन रविवार पर्यन्त असून जास्तीत जास्त लोकांनी सहकुटुंब याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *