प्रतिनिधी – मा.ना.अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात सहभागी होणारे शहरातील सर्वच पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना सकाळचे अल्पोपाहार, चहा व दुपारचे जेवण तसेच ५७६० पाण्याचे बॉटल्स यांची सोय यादगार सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी यादगार सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष फिरोज अजिजभाई बागवान, मा.नगरसेवक अमजद अजिजभाई बागवान, अन्सारभाई आतार, हुसेनभाई पठाण, जुबेरभाई आतार, इरफान बागवान, दादा मोडक, रियाजभाई बसरकोड, संतोष जाधव, जब्बार बागवान फिरोज ल. बागवान, शिवाजी माने, जीशान ,फरहान, अमन इत्यादी फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *