बारामती: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री , अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता बारामती नगर परिषद उर्दू शाळेतील 10 वी मधील उत्तीर्ण गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय विध्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन शेठ सातव , बारामती नगरीचे मा. नगराध्यक्ष इम्तियाज भाई शिकीलकर , राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अविनाश बांदल , मा . नगरसेवक बाळासाहेब पाटील , राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव , मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मेहबूब भाई बागवान , युसूफ भाई इनामदार , शब्बीर शेख , हारून शेख, आरिफ बागवान , शोएब बागवान , अमीद तांबोळी , पटवेकर बिलाल , अल्ताफ अत्तार , उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारामती शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आसिफ रज्जाक भाई बागवान यांनी केले . यावेळेस उर्दू माध्यमातून 10 वी मध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थीनी 1) अन्सारी मुस्कान अमीन 85% 2) तांबोळी मर्जिना हमीद 81% 3) पटवेकर हुदा बिलाल 79% यांचा सचिन शेठ सातव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात करण्यात आला.10 तील सर्व शिक्षकांचा सत्कार आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच विद्या प्रतिष्ठाण लॉ कॉलेज बारामती येथे तिसऱ्या वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सलमा गौसुद्दीन शेख हिचा सत्कार करण्यात आला . यावेळेस महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या आरोगी दीर्घायुष्या साठी सर्वानी प्रार्थना केली तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिज सय्यद , परवेज बागवान , जमीर इनामदार , रईस पठाण , राजू पठाण , फिरोज सय्यद , ऍड . सोहेल शेख , तन्वीर इनामदार , जब्बार बागवान , यांनी मोलाचे सहकार्य केले . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजीज भाई सय्यद यांनी केले व आभार ऍड सोहेल शेख यांनी मानले.