झारगडवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन..

झारगडवाडीचे युवा सरपंच अजित बोरकर यांच्या पुढाकारातून गोरगरिबांसाठी समाज उपयोगी आरोग्य शिबिर..

डोर्लेवाडी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 64 व्या वाढदिवसा निमित्त शनिवारी ( ता. २२ ) प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी ( बारामती ) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन झारगडवाडी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराला झारगडवाडी व परिसरातील ग्रामस्थांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये अस्थिरोग ( हाडाची ) तपासणी, दातांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच जनरल मेडिसिन व हृदयरोग तपासणी करण्यात आली. यात शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूराव दडस आणि त्यांच्या सर्व कर्मचारी स्टाप ने मोलाचे सहकार्य केले.

यावेळी छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयाराम महाडिक, माजी संचालक राजेंद्र बोरकर, झारगडवाडी गावचे सरपंच अजित बोरकर, माजी सरपंच नितीन शेडगे, माजी सरपंच वैशाली मासाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख बोरकर, बापूराव मासाळ, रामभाऊ करे, हृदयरोग तज्ञ डॉ. स्वप्नील खोमणे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अजिंक्य लवटे, दंत चिकित्सक डॉ. केतकी नाळे, नेत्ररोग तज्ञ डॉ. स्नेहल काळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. बापूराव दडस, प्रयोगशाळा तज्ञ सुप्रिया सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार झारगडवाडी चे ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख यांनी मानले.

राजेंद्र बोरकर – ( बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक )- झारगडवाडीचे युवा सरपंच अजित बोरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली होती त्याचप्रमाणे त्यांनी आज आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी आरोग्य शिबिर राबवले आहे त्याबद्दल सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो. अशाच प्रकारे इथून पुढे देखील समाज उपयोगी कार्यक्रम घ्यावेत. तसेच आपले लाडके नेते उपमुख्यमंत्री अजित दादा हे राज्याच्या मुख्यमंत्री व्हावेत. अशा शुभकामना त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो असे राजेंद्र बोरकर म्हणाले.

नारायण कोळेकर – ( छत्रपती कारखान्याचे संचालक )- झारगडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले यात वेगवेगळ्या अवयवाची चिकित्सकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली अशा आरोग्य शिबिरातून गोरगरिबांना लाभ मिळतो यामुळे इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीने आरोग्य शिबिरे राबवणे गरजेचे आहे. अजित दादांनी देखील नागरिकांच्या आरोग्यासाठी बारामतीमध्ये आरोग्यदालने उभा केली आहेत याचा फायदा बारामती तालुक्यातीलच नव्हे तर इतर तालुक्यातील गोरगरीब जनतेला देखील होत आहे. आणि अशा काम करणाऱ्या आमच्या नेत्याला चांगले आरोग्य लाभो त्यांच्या हातून देशाची राज्याची सेवा घडो अशा शुभेच्छा नारायण कोळेकर यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *