होलार समाजातील युवकांची होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेला सर्वाधिक पसंती….!

(राज्यभरातील नांदेड, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी केली सदस्य नोंदणी)

प्रतिनिधी – संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे कार्य तसेच दादासाहेब संघटनेमध्ये तरुणांना देत असलेले प्राधान्य पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली होलार समाजाचे युवा नेते सेवक भाऊ अहिवळे (बारामती), हनुमंत दादा केंगार (वालचंदनगर), आण्णासाहेब जहीरे (नांदेड), महेंद्र गोरे (फलटण) अनिल केंगार (वालचंदनगर), सचिन हेगडे (सोलापूर), आनंद अहिवळे (सोलापूर), हनुमंत केंगार (माढा) , सुनिल गोरे (फलटण) अशा राज्यातील अनेक ठिकाणांहून युवकांनी संघटनेमध्ये सदस्य नोंदणी ( प्रवेश ) केली.

बैठकीच्या सुरुवातीस होलार समाजाचे जेष्ठ नेते कै. राजाभाऊ माने सातारा यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सध्या होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेने वर्षभरात केलेले काम बघून महाराष्ट्रातील समाजामध्ये खूप सकारात्मक संदेश समाजामध्ये पोहोचलेला आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांनी संघटनेमध्ये सदस्य नोंदणी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.तसेच होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून सर्व युवकांनी महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तन घडवून आणायचे आहे.यासाठी युवकांनी पुढे येऊन काम केले पाहिजे .
सेवक भाऊ अहिवळे, हनुमंत दादा केंगार, महेंद्र गोरे, अनिल केंगार यांनी मनोगत व्यक्त करताना होलार समाजापुढे असंख्य अडचणी आहेत . त्या दूर करण्याचे आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व समाजाला न्याय देण्याचे काम सर्व युवकांनी एकत्र येऊन करायचे आहे, असे सांगितले
यावेळी होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते माळशिरस तालुका व महाराष्ट्राचे नेते दत्ताभाऊ ढोबळे, मार्गदर्शक नेते मल्हारी करडे , मार्गदर्शक नेते आश्वासन गोरवे ,अध्यक्ष सुहास बिरलिंगे साहेब , उपाध्यक्ष मोहन करडे सर , उपाध्यक्ष नाथा व पारसे ,कार्याध्यक्ष सागर भाऊ पारसे, उपाध्यक्ष गोविंद अहिवळे, सचिव दादासाहेब करडे, सहसचिव सचिन हेगडे , बापूसाहेब करडे, हे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *