तीन वर्षात तब्बल ५७० हुन अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
प्रतिनिधी – शिवनगर विद्या प्रसारक मंडळाने शहरी भागाप्रमाणे बारामती परिसरामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची दारे खुली व्हावित या उद्देशाने १९८३ साली इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि अँड इंजिनिअरिंगची माळेगाव बु (माळेगाव पॉलीटेक्निक) स्थापना करण्यात आली. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या शैक्षणिक सोई सुविधा व उच्च शिक्षित अनुभवी शिक्षकवर्ग यामुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून दर्जेदार अभियंते घडविले जात आहेत, गेल्या तीन वर्षात बजाज ऑटो लि., कमिन्स इंडिया लि., भारत गिअर्स लि., टाटा मोटर्स लि, केएसपीजी ऑटोमोटिव्ह प्रा. लि., किर्लोस्कर आयएसएमटी लि., पियाजिओ व्हेईकल्स, भारत फोर्ज लि., विषय कॉम्पोनेंट्स, वालचंदनगर इंडस्ट्रीज लि., जेसीबी इंडिया लि.,फोर्स मोटर्स लि. सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, कायनेटिक इलेक्ट्रिकल, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी, श्रायबर डायनामिक्स डेअरी, महिंद्रा अँड महिंद्रा, ब्रेम्बो ब्रेक इंडिया प्रा. लि., मदरसन ऑटोमेटिव्ह इंडिया प्रा. लि., डायना फिल्टर प्रा. लि., एसकेएफ लि.,एक्सप्लेओ इंडिया इन्फोसिस्टीम, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लि., इंटिलक्स इलेक्ट्रॉनिक्स, अद्विक हायटेक, इनयंत्र टेक्नॉलॉजी, अँफकाँन इन्फ्रास्ट्रक्चर लि., डेक्कन मेकॅनिकल अँड केमिकल इंडस्ट्रीज, मायक्रोमॅजिक टेक्नॉलॉजी, सेनूमुरो निर्माण प्रा. लि., स्पॅको टेक्नॉलॉजी, कायनेटिक टायझिन इलेक्ट्रिक कंपनी, हार्मोनी ऑरगॅनिक, टेक महिंद्रा कंपनी, वालेषा टेक्नॉलॉजी प्रा. लि. श्रेयश ऑटो एजन्सी, बारामती ऑटोमोटिव्ह, प्रिसिजन सील, राधेय मशिनिंग ली., इन्फोसिस ली., जि ई अँरोस्पेस, इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्स ली., फ्लीटगार्ड फिल्टर्स केपीआईटी लि., विप्रो लि, इन्फोसिस इत्यादी नामांकित कंपन्यांमध्ये तीन वर्षांमध्ये तब्बल ५७८ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री प्रमोद शिंदे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक भेटी, मैदानी खेळ, विविध गुणदर्शन कार्यक्रम, विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने, सेमिनार्स, वर्कशॉप वर्षभर आयोजित केले जातात , विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबरोबर व्यक्तिमत्व विकास व मुलाखत कौशल्य आदी विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने कंपन्यांच्या मुलाखतीस सामोरे जात असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने यावर्षी डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी मुलांचा आणि पालकांचा कल वाढत असल्याचे संस्थेचे प्राचार्य प्रा. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी बजाज ऑटो २४, टाटा मोटर्स ५४, केएसपीजी ऑटोमोटिव्ह मावळ २०, पियाजिओ व्हेईकल्स १९, ऑरा लेसरफॅब १७, केनॉफ सिलिंग १३, कमिन्स इंडिया १२, केपीआईटी ०४, जॅक्सन ली ०६ भारत फोर्ज आणि विप्रोमध्ये प्रत्येकी एक, अशा एकूण १७१ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली असल्याचे आणि शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये २१०, २०२०-२१ मध्ये १९७ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निवड झाली आहे, १९८३ पासून उत्तीर्ण झालेले सुमारे चौदा हजार पाचशे विद्यार्थी देशात आणि परदेशामध्ये विविध कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करीत आहेत तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागमध्ये ऑटोमोबाईल डिपार्मेन्टचे ४५ हुन अधिक असिस्सस्टन्ट मोटार व्हेहीकल इन्स्पेक्टर ( आर टी ओ ) या पदावर कार्यरत असल्याचे माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.
माळेगाव पॉलीटेक्निकमध्ये दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी मिळत असल्याने शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब तावरे, विश्वस्त श्री वसंतराव तावरे, श्री अनिल जगताप, श्री महेंद्र तावरे, श्री रामदास आटोळे, श्री गणपत देवकाते, श्री रविंद्र थोरात, सौ. सिमा जाधव, सौ. चैत्राली गावडे, माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष श्री सागर जाधव व संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले.