सपकळवाडी येथे देहदान व अवयदान या विषयावरील चर्चासत्र संपन्न

बारामती, दि. २०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत इंदापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, सपकळवाडी येथे देहदान व अवयदान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अवयवदान अभियानाच्या नोडल अधिकारी डॉ प्रज्ञा भालेराव, समाजसेवा अधीक्षक डॉ. तुषार सावरकर, संध्या नाईक, विनायक साखरे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब सपकाळ, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

डॉ. भालेराव यांनी देहदान व अवयवदान या संकल्पनेविषयी माहिती दिली. तसेच देहदान व अवयवदान यातील फरक, प्रक्रिया व तांत्रिक बाबी याबाबतही मार्गदर्शन केले.

डॉ. सावरकर यांनी अवयवदान, नैसर्गिक मृत्यू, मेंदूची मृतअवस्था, जीवित व्यक्तींद्वारे होणारे अवयव दान, मेंदू मृत अवस्थेत होणारे अवयवदान याबाबत असलेल्या कायदेशीर तरतूदींबद्दल माहिती दिली.

यावेळी देहदानासाठी १५० तर अवयवदानासाठी २५० सदस्यांनी नोंदणी केली. तसेच डॉ. सावरकर यांनी उपस्थितांना अवयवदानाबाबत जनजागृतीची प्रतिज्ञा दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *