प्रतिनिधी – आज सकाळी कसबा आगवणे गल्लीमध्ये सुलभा आगवणे यांना पाणी भरताना लिंबाच्या झाडाला चायना मांजामध्ये अडकलेला लटकत्या अवस्थेत घुबड पक्षी दिसला. तो चायना मांजामध्ये पूर्ण अडकला होता. त्याला उडता येत नव्हते जखमा सुद्धा झाल्या होत्या. हे पाहताच सुलभा आगवणे यांनी सिद्धनाथ आगवणे व संजय मोरे यांना सांगितले असता सिद्धनाथ आगवणे याने झाडावर चढून मांजा तोडला व त्याला खाली आणले नंतरन संतोष आगवणे यांनी प्राणिमित्र बबलू कांबळे व त्यांच्या टीमला सांगितले असता त्यांनी येऊन तो घुबड पक्षी ताब्यात घेतला व अशा प्रकारे त्या घुबड पक्षाला अधिक श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच जीवदान मिळाले. तरी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed