प्रतिनिधी – स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत बारामती नगरपरिषदेच्या वतीने 18 जुलै ते 31 जुलै 2023 या कालावधीत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून निसर्गातील पंचतत्त्वांचे (पृथ्वी,अग्नी, वायू, जल, आकाश ) यांचे संरक्षण होऊन पुढील पिढी करता पर्यावरण संतुलित राहण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आले आहे, केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून स्वच्छता ही एक लोक चळवळ व्हावी या करीता लोककेंद्री स्वरूपाने स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे, हे दोन्ही अभियान फक्त शासकीय योजना न राहता एक लोकभूमिक चळवळ व्हावी या उद्देशाने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याकरिता माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत..
खरंतर कुठलीही सरकारी योजना यशस्वी व्हायची असेल तर तिचं रूपांतर हे लोक चळवळीत होणे गरजेचे असतं म्हणून माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण या अभियानाचा प्रसार घराघरात व्हावा या अभियानाची जनजागृती व्यापक स्वरूपात व्हावी या हेतूने बारामती नगर परिषदेच्या वतीने विविध शालेय स्पर्धा व नागरिकांसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे..
आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा मध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, आदर्श सोसायटी स्पर्धा, हरित घर स्पर्धा, जिंगल्स / चारोळी/ गीत स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
सदर स्पर्धेतील विषय पुढीलप्रमाणे आहेत
१ )प्लास्टिक मुक्त बारामती
२)कचरा मुक्त बारामती
३) स्वच्छ सुंदर हरित बारामती सहभाग सर्वांचा अभिमान सर्वांचा..
इत्यादी विषयावरती या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत विविध शालेय गटांमध्ये तसेच नागरिकांसाठी महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
स्पर्धकांच्या विविध गटा नुसार पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी, अकरावी ते बारावी व पदवीधर अशा विविध गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच शालेय विद्यार्थ्यांनप्रमाणेच बारामती मधील नागरिक व महिला यांच्यासाठी देखील सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे महिला वयोगट वय वर्षे 25 ते 50, तसेच पुरुष वयोगट 25 ते 50, व ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 50 च्या पुढे..
बारामती कर नागरिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे नगरपालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे .स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांना स्मृतिचिन्ह व बक्षीस देण्यात येतील तसेच स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील विविध शाळा महाविद्यालय कॉलेज व नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.