बारामती: (१७ जुलै २०२३) या बैठकीमध्ये महराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यामध्ये “अजित कृतज्ञता महिना” राबवून विविध सामाजिक शैक्षणिक, क्रीडा विषयक, आरोग्य, पर्यावरण पूरक व धार्मिक अशा उपक्रमांनी साजरा करण्यात येणार
असून त्याचप्रमाणे नामदार अजित पवार यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने “अजित विद्यार्थी दत्तक” योजनेच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व सुविधा पुरविणे.
येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व इतर निवडणुकीच्या निमित्ताने नवीन मतदार नोंदणी करणेसाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती करणे. बारामती तालुक्यामधील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शिबिर आयोजित करणे. तसेच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुणे ते बारामती (नीरा मार्गे) सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच त्याचा बक्षीस वितरण समारंभ दुपारी १:३० वा. ग.दि.मा सभागृह विद्या प्रतिष्ठान बारामती येथे संपन्न होणार असून ही सायकल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्या यादीमध्ये काही चूक दुरुस्ती असल्यास मतदारांनी दावे, हरकती, घेणे संदर्भात माहिती घेणे.
नामदार अजित पवार यांची पाचव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल बैठकीमध्ये अभिनंदनचा ठराव पुणे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी मांडला व त्यास किरण तावरे यांनी अनुमोदन देवून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
तसेच अजित पवार यांना पाठिंबा देणेसाठी बारामती तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून द्याव्याची असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी ही प्रतिज्ञापत्र भरून देणेबाबत चर्चा करणेत आली. यावेळी उपस्थितांचे स्वागत पुणे जिल्हा राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अनिल सोरटे यांनी केले.
तर बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक करून अजित पवार यांचे वाढदिवसानिमित्त घेणेत येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच पक्षाचे माध्यमातून राबविण्यात येणारे कार्यक्रम संदर्भात सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे यांचेसह बारामती तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व पक्ष संघटनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी,महिला,युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.