प्रतिनिधी – मंडळ कृषी अधिकारी पाटस महेंद्र जगताप यांनी पीकविमा योजनेबाबत माहिती देताना सांगितले की दौंड तालुक्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील बाजरी , कांदा या पिकांसाठी पीकविमा लागु असुन, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मधुन डाळिंब पिकासाठी विमा योजना लागु आहे.डाळिंब पिकाचा पीकविमा हफ्ता भरण्यासाठी मुदत १४ जुलै व बाजरी, कांदा पिकासाठी पीकविमा भरण्यासाठी मुदत ३१ जुलै अशी आहे.
बाजरी, कांदा पिकासाठी शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया भरायचा आहे,राहिलेला विमा हप्ता शासन भरणार आहे.तर डाळिंब पिकासाठी एकरी शेतकऱ्यांना २६०० रुपये हफ्ता आहे.
शेतकऱ्यांनी बाजरी, कांदा या पिकांचा पीकविमा काढल्यानंतर त्यांना पिकाची उगवण न होणे, गारपीट,पुर, दुष्काळ, पावसातील खंड, उत्पादनातील घट इत्यादी बाबींपासुन विमा संरक्षण मिळणार आहे.तसेच डाळिंब ची विमा योजना ही हवामान आधारित असुन स्वयंचलित हवामान आधारित केंद्र यांच्या पावसाच्या आकडेवारी नुसार व हवामानातील बदल यानुसार
जो ट्रिगर लागु होईल त्यानुसार शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम लागु होते.तरी पाटस मंडळ कार्यक्षेत्रातील वरवंड,पाटस, कुरकुंभ, मळद,कौठडी, जिरेगाव,रावणगाव, खडकी, स्वामीचिंचोली, वासुंदे, हिंगणीगाडा परिसरातील शेतकरी बंधुंनी डाळिंब, बाजरी, कांदा पिकांचा पीकविमा भरावा आणि होणाऱ्या पीक नुकसानीसाठी विमा संरक्षण घ्यावे व आपले आर्थिक नुकसान कमी करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed