बारामती, दि.६: कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या (स्मार्ट) मूल्य साखळी विकास शाळेअंतर्गत प्रतिभा फार्मर प्रोडूसर कंपनी माळेगाव (बु)च्या सभासद शेतकऱ्यांसाठी आयोजित पेरू पिक शेतीशाळा संपन्न झाली.
यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, प्रतिभा फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष अशोक तावरे यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.
पेरू पिकातील छाटणी तंत्रज्ञान तसेच छाटणी केल्यानंतर करावयाची फवारणी, खोडांना करावयाचे पेस्टिंग त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यशवंत जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.