प्रतिनिधी – बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन 2023-24 च्या अध्यक्षपदी डॉ.निलमकुमार शिरकांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याच बरोबर उपाध्यक्षपदी डॉ.राहुल शिंगाटे व डॉ अर्चना सोनवणे ,सचिवपदी डॉ राकेश मेहता व डॉ अमोल जगताप तर खजिनदार पदी डॉ नितीन पाटील व डॉ अमित भापकर यांची निवड करण्यात आली. यावेळी मेडिकोज गिल्ड बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ शेखर शाह (अध्यक्ष मेडिकोज गिल्ड बारमती ) तसेच प्रमुख पाहुने म्हणून डॉ सचिन बालगुडे (अध्यक्ष बारमती तालुका राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ) व इतर मान्यवर व तालुक्यातील समस्त डॉक्टर उपस्थीत होते . यावेळी बारामती तसेच सभोवतालच्या भागातील डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संघटना वृद्धिसाठी आम्ही कटिबद्व आहोत. असे नवनिवार्चित अध्यक्ष डॉ नीलमकुमार शिरकांडे यांनी सांगितले. बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन 2023-24 कार्यकरणी पुढील प्रमाणे -अध्यक्ष डॉ नीलमकुमार शिरकांडे -उपाध्यक्ष -डॉ राहुल शिंगाटे ,डॉ अर्चना सोनवणे, सचिव-डॉ राकेश मेहता, डॉ अमोल जगताप, खजिनदार -डॉ नितिन बेलदार पाटिल, डॉ अमित गोरख भापकर, इतर समित्या – क्रीड़ा समीती -डॉ तेजस खटके ,डॉ जीवन कोकरे ,डॉ सचिन लोनकर ,डॉ रुपेश माने सांस्कृतिक समिती -डॉ महावीर संचेती डॉ सागर साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed