प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात व्यासमुनी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी प्राचार्य मोरे सर, उपमुख्याध्यापक देवडे सर, पर्यवेक्षक सणस सर, हिवरकर मॅडम, व सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पळसे सर यांनी केले. विद्यार्थांमधून समृद्धी दळवी हिने आपले गुरुबद्दल मनोगत व्यक्त केले. तर पर्यवेक्षक श्री सणस सर यांनी गुरुपौर्णिमा विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.यावेळी सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी चेतक सावंत याचा विशेष सत्कार करण्यात आला. चेतक सावंत हा UPSC परिषेमधून IFS पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण याच विद्यालयात पार पडले. त्यांनीही आपल्या मनोगतातून शाळेविषयी व शिक्षक यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे आभार सुदाम गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *