प्रतिनिधी – तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल व मंडळ कृषी अधीकारी चंद्रकांत मासाळ यांचे मार्गदर्शनखाली कृषी संजीवनी सप्ताह निमित्त काल दिनांक २८/६/२०२३ रोजी मौजे कांबळेश्वर येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कृषी सहाय्यक श्री ऋषिकेश कदम यांनी जमीन सुपीकतेबाबत शेतकऱयांमध्ये जनजागृती केली, सेंद्रीय कर्बाचे महत्त्व लोकांना पटवून दिले, कंपोस्ट बाबतच्या पद्धती शेतकऱयांना समजून सांगितले, जैवीक पद्धतीने जमीनीची सुपीकता वाढवणे याबद्दल जनजागृती केली, मृद चाचणीचे महत्व तसेच शिफारशीनुसार खतांचा वापर कसा करावा, याबाबत शेतकऱयांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात श्री संतोष पिसे कृषी पर्यवेक्षक यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे गणेश जाधव यांनी पीएमएफएमई योजनेची माहिती दिली. श्री विश्वजित मगर यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. श्री चव्हाण, निवृत्त कृषी अधिकारी यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व बीज प्रक्रीया प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करुन दाखविले. यावेळी कांबळेश्वर परिसरातील बहुसंख्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.