राजकारणातील भीष्म पितामह भाई गणपत आबा देशमुख यांना सरकारने सर्वोत्कृष्ट पुरस्कारने सन्मानित करावे – कल्याणी वाघमोडे

सांगोला, प्रतिनिधी – ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आज क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली . यावेळी त्यांच्या पत्नी ,सुनबाई यांची भेट घेतली तसेच आबांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी भेटून आबाच्या आठवणींना उजाळा दिला .राजकारणातील भीष्म पितामह असणाऱ्या भाई गणपत आबा देशमुख यांना सरकारने सर्वोत्कृष्ट पुरस्कारने सन्मानित करावे , हीच खरी श्रद्धांजली ठरेल,असा मानसभाव कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केला .त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सरकारकडे पाठपुरावा केला जाईल ,असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले .

स्वच्छ चारित्र्य संपन्न,साधी राहणीमान ,उच्च विचारसरणी असा महाराष्ट्रातील हा नेता होता. गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब गेले. मात्र, जाण्याआधी अनेक विक्रम आपल्या नावावर करून गेले. 1962 ला आबांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढवली. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्ष हाच त्यांचा पक्ष . आबा मंत्रीही झाले. मात्र, त्यांचा साधेपणा कायम अबाधित राहिला. अधिवेशनात आबांच्या विधिमंडळातील 50 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष प्रस्ताव आणला होता.गणपत आबा हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. देशामध्ये सर्वाधिक म्हणजे ११ वेळा निवडून येण्याचे रेकॉर्ड करणारे गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब हे सर्व सदस्यांसाठी आदराचे आणि प्रेरणेचे स्रोत होते. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नेहमीच त्यांना यशोशिखरावर घेऊन गेली. 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विधानसभेत निवडून गेले होते.द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम माजी आमदार देशमुख यांनी मोडला होता. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार होते. त्यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे नेतृत्व केले.टेम्भू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. गणपत आबा दोनवेळा मंत्री झाले होते. मंत्रिपद गेल्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला. आमदार म्हणून ते नेहमी एसटीने प्रवास करत होते. एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांना ओळखले जाते.

गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. गणपतराव देशमुखांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 साली सोलापूर येथे झाला. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात होते. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता. 2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली.

राजकीय संन्यास घेतल्यानंतरही त्यांची कामं कमी झाली नाहीत. कोविड काळातही कमालीचे सक्रीय होते. आबांची विचारसरणी स्पष्ट व गांधीवादी होती. अशा या जनमाणसातील माणसाचं जाणं खरोखर चटका लावून जाणारं आहे. आज महाराष्ट्रानं राजकारणातला भीष्म पितामह गमावलाय ,असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *