प्रतिनिधी – दिनांक 27/06/2023 रोजी मौजे सायांबाचीवाडी येथे कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत तालुका स्तरीय शेतकरी महिला सन्मान दीन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया बांदल, मंडळ कृषी अधिकारी श्री सुभाष बोराटे, कृषी पर्यवेक्षक श्री बापूराव लोदाडे, श्री प्रशांत माने, सौ मीरा राणे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक श्री पृथ्वीराज लाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ बांदल यांनी भूषविले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे सौ अर्चना सातव यांचा परिचय सौ सुप्रिया पवार यांनी करून दिला. सौ सातव ताईंनी महिलांना मार्गदर्शन केले. नंतर शेती मद्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील शेतकरी महिलांचा सन्मान पत्र देऊन व फेटे बांधून सौ बांदल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला शेतकरी ज्योती भापकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ. बांदल यांनी कृषि क्षेत्रात महिलांचा सहभाग ,महिलांचे कृषि क्षेत्रातील योगदान,त्याच्या कष्टाचा सन्मान,महिला गट शेती,शेती प्रक्रिया इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संध्या पांढरकर यांनी केले. कृषीसखी रोहिणी इंगळे व कृषी विभागातील सुपे मंडळ मधील सर्व कृषीसहाय्यक यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचालन सौ तृप्ती गुंड कृषी सहाय्यक यांनी केले. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.