प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने दौंड तालुक्यात तालुका कृषि अधिकारी राहुल माने, मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन, पौष्टिक आहार दिन, कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, जमीन सुपीकता जागृती दिन,कृषी क्षेत्राची भावी दिशा,व शेवटी १ जुलै रोजी कृषी दिन असे विविध दिन साजरे करण्यात येणार आहे.त्यानुसार आज स्वामीचिंचोली, रावणगाव, मळद, पाटस, वरवंड, बिरोबावाडी, वासुंदे, जिरेगाव या गावांमध्ये कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन व पौष्टिक आहार दिन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी हनुमंत बोडके यांनी खरीप हंगामातील आपत्कालीन पीक नियोजन, बीबीएफ यंञाने पेरणी, बीजप्रक्रिया,ऊसासाठी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, हुमणी नियंत्रण साठी प्रकाश सापळा, याबाबत मार्गदर्शन केले.पौष्टीक आहार दिनाच्या अनुषंगाने कृषी पर्यवेक्षक पोपट चिपाडे यांनी पौष्टिक तृणधान्ये यांचे लागवड तंत्रज्ञान व आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.मंडळ कृषी अधिकारी महेंद्र जगताप यांनी कृषी संजीवनी सप्ताह, पीएम किसान योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याबाबत मार्गदर्शन केले.कृषी संजीवनी सप्ताह यशस्वी होण्यासाठी गावपातळीवर कृषि सहाय्यक अंगद शिंदे, अझरुद्दीन सय्यद, शंकर कांबळे, प्रकाश लोणकर, राहुल लोणकर, संदीप सरक, मोनिका दिवेकर, रेखा पिसाळ, हे विशेष प्रयत्न करीत आहे.