प्रतिनिधी – आज दिनांक २६/०६/२०२३ रोजी मौजे काटेवाडी येथे कृषी संजीवनी सप्ताह 2023 अंतर्गत पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपविभागीय कार्यालयातील तंत्र अधिकारी मा.श्रीमती रश्मी जोशी, मा.तालुका कृषी अधिकारी, बारामती श्रीमती सुप्रिया बांदल, मा. मंडळ कृषी अधिकारी बारामती श्री चंद्रकांत मासाळ, मा. कृषी पर्यवेक्षक श्रीमती मीरा राणे, कृषी सहाय्यक श्री. सचिन खोमणे, श्रीमती सुप्रिया पवार यांची होती, श्रीमती सुप्रिया बांदल व श्रीमती रश्मी जोशी यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहाराच्या दृष्टीने महत्त्व तसेच कडधान्य, भाजीपाला, फळपिके, दुग्धजन्य पदार्थ यांचे आहारातील आरोग्याच्या दृष्टीने व विपणनाच्या दृष्टीने महत्त्व पटवून दिले. सदर कार्यक्रमांमध्ये काटेवाडी गावातील महिलांनी विविध प्रकारचे पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते पैकी पहिल्या तीन निवड झालेल्या महिलांना आकर्षक अशी भेट वस्तू देण्यात आली. बाकी सर्व महिलांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कृषी सहाय्यक श्रीमती योगिता सांगळे यांनी केले. व कृषी सहाय्यक सचिन खोमणे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.