प्रतिनिधी – बारामती येथील राधेशाम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या कार्यक्रमात इ 5 वी ते 12 वी पर्यंतचे 2200 विद्यार्थी व विद्यालयातील सर्व शिक्षक सहभागी होते. या सर्व विद्यार्थ्यांचे सामूहिक योगा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयातील उपशिक्षक श्री जयवंतराव मांडके यांनी योगाच्या प्राथमिक क्रिया पासून केली. प्रथम 15 मीन विविध प्रकार घेऊन सरांनी वॉर्म अप घेतला. विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री सुदाम गायकवाड यांनी योगासने व प्राणायाम यांचे महत्व विशद केले. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय बारामती च्या संचालिका चंद्रलेखा यांनी विद्यार्थांना मौनाचे महत्व स्पष्ट करून सांगत त्यांना मौन करावयास शिकवले. विद्यार्थानी ही मोठ्या उत्साहात या योग् प्रात्यक्षिक मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे पी.पी. उपमुख्याध्यापक श्री देवडे के.डी.,पर्यवेक्षक श्री निवास सणस, रयत बँकेचे माजी चेअरमन श्री अर्जुन मलगुंडे,जेष्ट शिक्षक श्री आनंदराव करे, श्री सुधीर जाधव उपस्थित होते.