प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे आज नवीन विद्यार्थाचे गुलाबपुष्प व नवीन पुस्तक देऊन मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार दि 15 जून पासून राज्यभरातील शाळा सुरू होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विद्यालयात इ 5 वी ते 12 वी च्या सर्व विद्यार्थाचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.तसेच इ 5 वी ते 8 वी पर्यंतच्या मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.सदर कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे ,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक श्री निवास सणस , आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे इतर सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी इ 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.सर्व नवीन विद्यार्थी यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed