पुणे, दि. ८ :- सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागीय कार्यालयांतर्गत अन्न विभागाचे उद्योग भवन औंध येथील आणि औषध विभागाचे लकी बिल्डींग नवीन गुरुवार पेठ येथील कार्यालय अशी दोन्ही कार्यालये १ मे २०२३ पासून एफडीए भवन, पेठ क्र.४, प्लॉट क्र.१ व २, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, स्पाईन रोड, ॲकॉर्ड हॉस्पिटल शेजारी, मोशी, पुणे- ४१२१०५ या प्रशासनाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सह आयुक्त अ.गो. भुजबळ यांनी कळविले आहे.

स्थलांतरित कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२०-२९९५३०४५/४६/४७ असा असून ईमेल fdapune2019@gmail.com, fdapunedrug@gmail.com असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed